• राजा माणूस ( raja manus )
    Nov 27 2022

    यावर्षी ४ जूनला आपल्या सर्वांचे लाडके अशोकमामा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची पंच्याहत्तरी झाली..... जवळजवळ अर्धशतकाहून अधिक काळ आपल्या अभिनयानं अनेक रसिकांना निखळ आनंद देणाऱ्या या अवलिया कलावंतानं चित्रपट, मालिका, नाटक अशा अनेक क्षेत्रांत मुक्त मुशाफिरी केली. अशोक सराफ हे नाव माहित नसलेला मराठी माणूस आज शोधूनही सापडणार नाही. आपल्या लाडक्या अशोकमामांनाही शब्दरूपी भेट सादर अर्पण....

    Show More Show Less
    6 mins
  • स्वरभास्कर (swarbhaskar)
    Nov 19 2022

    स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.... भारतीय शास्त्रीय संगीतात या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त कर्नाटक संगीतच नव्हे, तर शास्त्रीय संगीताची अभिजात परंपरा जगभर पोहोचणाऱ्या उत्तुंग प्रतिभेच्या कलाकारांमध्ये पंडितजींचं नाव अग्रक्रमाने आणि आदरानं घेतलं जातं. पण भीमसेन गुरुराज जोशी या मुलाचा स्वरभास्कर बनण्यापर्यंतचा प्रवास त्यांच्या कुठल्याही मैफिलीइतकाच रोमहर्षक आणि थक्क करणारा आहे..... याच प्रवासाची ही एक छोटीशी झलक

    लेखन - अक्षय संत

    अभिवाचन - गणेश इनामदार

    Show More Show Less
    8 mins
  • छोटी बहू (choti bahu )
    Nov 12 2022


    भारतीय सिनेमाच्या इतिहासात काही व्यक्तिरेखा रजतपटावर अशा काही सादर झाल्या की त्यांना अभिजाततेचा दर्जा आपोआपच प्राप्त झाला. 'दो बिघा जमीन' चा शेतकरी, 'प्यासा' चा विजय, 'शोले' चा गब्बरसिंग ही काही प्रातिनिधिक उदाहरणं.... याच मांदियाळीतलं एक तेजोमय नाव म्हणजे मीनाकुमारीची 'छोटी बहू'..... गुरुदत्त निर्मित आणि अब्रार अल्वी दिग्दर्शित 'साहिब बीवी और गुलाम' या चित्रपटातली ही अत्यंत गाजलेली आणि गुंतागुंतीची व्यक्तिरेखा.... बिमल मित्र यांच्या याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडे बंगालमधील जमीनदारी संस्कृतीचा होत गेलेल्या ऱ्हासाचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळालं. आपल्यापैकी बहुतेकांनी हा चित्रपट नक्कीच पाहायला असेल. यातील छोटी बहूच्या व्यक्तिरेखेचा हा आलेख....

    लेखन - अक्षय संत

    अभिवाचन - गणेश इनामदार

    Show More Show Less
    7 mins
  • देव देव्हाऱ्यात नाही (Dev devhryat nahi)
    Nov 5 2022

    भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजपर्यंत अनेकांना सुपरस्टार, मेगास्टार किंवा तत्सम पदव्या बहाल करण्यात आल्या..... अनेक प्रतिभावान कलावंतांनी त्यांच्या बहराच्या काळात उत्तुंग कामगिरी करून ठेवली आणि सिनेमाला मोलाचं योगदान दिलं. परंतु आजही चिरतरुण म्हटलं की कुठल्याही सिनेमाप्रेमीच्या तोंडी एकच नाव येतं.... देव आनंद.... कोणी त्याला भूलोकीचा गंधर्व म्हणतं, कोणी त्याला मदनाची उपमा देतं तर कोणी त्याच्या सळसळत्या उत्साहाचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतं..... देवानं पृथ्वीवर आनंद वाटण्यासाठी पाठवलेल्या या सदाबहार सदासतेज आनंदयात्रीला हा शब्दफुलोरा सादर अर्पण.....

    लेखन - अक्षय संत

    अभिवाचन - गणेश इनामदार

    Show More Show Less
    8 mins
  • स्वराशा (swaraasha)
    Oct 29 2022

    सदाबहार महान गायिका आशाताई अर्थात आशा भोसले यांच्या बद्दल थोडंसं मनाच्या कोपऱ्यातून आलेलं

    लेखन- अक्षय संत

    अभिवाचन - गणेश इनामदार

    Show More Show Less
    9 mins
  • saheli re........ (सहेली रे.......)
    Oct 22 2022

    गान तपस्विनी किशोरी अमोणकर यांच्या बद्दल मनाच्या कोपऱ्यातून आलेल्या सहज भावना.

    लेखन- अक्षय संत

    अभिवाचन- गणेश इनामदार

    Show More Show Less
    5 mins
  • " kalavrund" intro
    Oct 19 2022

    kalavrund is our new podcast. Do listen intro of our podcast.

    Show More Show Less
    1 min