• छोटी बहू (choti bahu )

  • Nov 12 2022
  • Length: 7 mins
  • Podcast

छोटी बहू (choti bahu )

  • Summary


  • भारतीय सिनेमाच्या इतिहासात काही व्यक्तिरेखा रजतपटावर अशा काही सादर झाल्या की त्यांना अभिजाततेचा दर्जा आपोआपच प्राप्त झाला. 'दो बिघा जमीन' चा शेतकरी, 'प्यासा' चा विजय, 'शोले' चा गब्बरसिंग ही काही प्रातिनिधिक उदाहरणं.... याच मांदियाळीतलं एक तेजोमय नाव म्हणजे मीनाकुमारीची 'छोटी बहू'..... गुरुदत्त निर्मित आणि अब्रार अल्वी दिग्दर्शित 'साहिब बीवी और गुलाम' या चित्रपटातली ही अत्यंत गाजलेली आणि गुंतागुंतीची व्यक्तिरेखा.... बिमल मित्र यांच्या याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारित होता. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडे बंगालमधील जमीनदारी संस्कृतीचा होत गेलेल्या ऱ्हासाचं अत्यंत प्रत्ययकारी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळालं. आपल्यापैकी बहुतेकांनी हा चित्रपट नक्कीच पाहायला असेल. यातील छोटी बहूच्या व्यक्तिरेखेचा हा आलेख....

    लेखन - अक्षय संत

    अभिवाचन - गणेश इनामदार

    Show More Show Less

What listeners say about छोटी बहू (choti bahu )

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.