• # 1620: ‘रंग बदलू‘ मंडळी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Nov 8 2024

    Send us a text

    जगात प्रत्येक जीवाकडे आपली अशी एक खास कला असते. या कलेच्या माध्यमातून ते त्यांचं जीवन सुरक्षितपणे जगत असतात. असंच हे एक खास गिफ्ट सरड्यांना निसर्गाकडून मिळालं आहे. असं मानलं जातं की, सुरक्षेनुसार सरडे त्यांचा रंग बदलतात. शिकाऱ्यांपासून वाचण्यासाठी सरडे जिथे बसलेले असतात, आपोआप ते त्या रंगात स्वत:ला सामावून घेतात. सरडे त्यांचा रंग बदलून स्वत:चा बचाव करतात. सरडे आपलं पोट भरण्यासाठी शिकारही करतात. शिकार करताना देखील सरडे त्यांचा रंग बदलतात. ज्याने शिकार पळून जात नाही. त्यामुळे सरडे शिकार सहजपणे करू शकतात.

    Show More Show Less
    8 mins
  • 1619: ‘आपली राष्ट्रीय दांभिकता.' कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Nov 6 2024

    Send us a text

    देशाच्या प्रगतीचे मापन करायचे झाले तर नागरिक काय लायकीचे काय लायकीचे आहेत या निकषावर करायला हवे.
    पाहता आपल्या नागरिकांचे सार्वजनिक उद्योग?
    रात्री दोन वाजता ढिनच्यॅक ढिनच्यॅक संगीत गाडीत वाजवत गल्ल्यांतून फिरणारे,
    गाडीचा दरवाजा उघडून ओकल्यासारखे तंबाखू थुंकणारे,
    ऐतिहासिक इमारतींवर स्वत:चे आणि स्वत:च्या टिनपाट मैत्रिणीचे नाव कोरणारे,
    कोणी बघत नाही म्हणून सार्वजनिक शौचालयाचा वापर करून पाणी न टाकता निघून जाणारे, शाळेतल्या लहान मुलांना वाटायला आणलेल्या खिचडीचा तांदूळ बाजारात नेऊन विकणारे.....
    ही यादी कितीही लांब होऊ शकते......

    Show More Show Less
    5 mins
  • # 1618: फालतू वाटणारी गोष्ट सुद्धा जगाला पुढे नेऊ शकते. लेखक : अनामिक. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) )
    Nov 6 2024

    Send us a text

    पियाँटिक ह्या जनरल मोटर्सच्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली. माझ्या गाडीला व्हॅनिला आईसक्रीम आवडत नाही. इंजीनिअरने परत परत गाडी चेक केली, पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे.
    आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. .....

    Show More Show Less
    4 mins
  • # 1617: आठवणींची पेटी : ‘बंब'. लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Nov 4 2024

    Send us a text

    केवळ एक साधा बंब हा विषय पण त्यावर किती जणांकडून काय काय ऐकायला मिळाले...रेखाचा नवरा इतक्या गरीबीतून वर आला आहे हे मला नव्यानेच कळले .तो इतका नम्र आणि साधा का याचेही कोडे उलगडले!
    तुमच्या घरी होता का बंब? तुम्हाला आली का कुठली आठवण?असेल तर मला जरूर कळवा..

    Show More Show Less
    11 mins
  • # 1616 : संगतीचा अलभ्य लाभ. लेखक डॉ. वर्षा तोडमल. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Nov 3 2024

    Send us a text

    साधूने बगळ्याच्या मनातील कपट जाणले आणि त्याच्या मुखातून सहज उद्गार बाहेर पडले
    " घस घस घसी । और उपर डाले पानी ।।तुम्हारे मन मे जो कुछ है । वो हमने जानी ।।"

    राजाने विचार केला थोड्या वेळच्या संतसंगाने माझा प्राण वाचला जर निरंतर संतसंग केला तर काय होईल?

    Show More Show Less
    4 mins
  • # 1615: मुक्ती. लेखक:- स्वाती नितीन ठोंबरे कथन :- सौ नीता दिनेश प्रभू
    Nov 2 2024

    Send us a text

    "आता गुंत्यातून मोकळी हो… तू बावीस वर्षं सिंचलेलं संस्काराचं रोपटं छान फोफावलंय… आणि तुझ्या मुलींना आणि नवऱ्याला कवेत घेऊन भक्कमपणे उभं आहे, हे बघ आज… आणि निश्चिंतपणे मुक्त हो!”

    Show More Show Less
    6 mins
  • # 1614: इव्हेंट. लेखक:- स्वप्ना (मायी)मुळे कथन:- सौ निता दिनेश प्रभू
    Nov 1 2024

    Send us a text

    " फक्त आदर आदर ह्याच्या नावाखाली हे एकमेकांना प्रेमानं जवळ घेणं आपण विसरायला लागलो ते ह्या इव्हेंट मध्ये सापडलं ग मला ह्या लख्ख झालेल्या घंगाळा सारखं.क्षण जगून घ्यावा हा विचार आतमध्ये ह्या कमळाच्या पाकळ्यांसारखा उमलत गेला,..म्हणून मी आता ठरवलं आयुष्य इव्हेंट करून जगायचं अगदी सुंदर आणि आंनदी"

    Show More Show Less
    5 mins
  • # 1613: आगळी वेगळी दिवाळी, ले.सुजाता लेले, कथन: ( मीनल भडसावळे )
    Oct 31 2024

    Send us a text

    ही गोष्ट आहे दुष्काळग्रस्त भागात अन्नपाण्याअभावी झालेल्या परिस्थितीची .तिथे जाऊन मनू आणी तिच्या कुटुंबियांनी त्यांची दिवाळी साजरी केली, त्या लोकांना चार चांगले क्षण उपभोगायला दिले. तसेच त्या खडतर परिस्थितीत जगणाऱ्या कणखर लोकांच्या रूपाने मुलांना वास्तवाचे भान देणार्‍या कुटुंबाची आगळीवेगळी गोष्ट आहे.

    Show More Show Less
    5 mins